विभागीय अध्यक्षांच्या दालनात विज्युक्टाची सभा

0
18

गोंदिया,दि.२२ःः विदर्भ ज्युनियर कॉलेज टिचर्स असो.च्या पदाधिकाèयांची बोर्ड परिक्षेसंबधीची सहविचार सभा मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांच्या दालनात पार पडली.सभेत विज्युक्टाचे महासचिव अशोक गव्हाणकर,गोंदिया अध्यक्ष प्रा.एम.जी.दस्तगीर,जिल्हासचिव प्रा.ज्योतिक ढाले,प्रा.रोमेंद्र बोरकर,प्रा.अभिजित पोटले,प्रा.कोरडे,प्रा.ढगले,प्रा.गोरे,प्रा.तंभाखे,प्रा.धांडे,प्रा.qहगणेकर,डॉŸ.तेलरांधे,डॉ.भुजाडे,पा.गुंडलवार यांच्यासह लातुर बोर्डाचे अध्यक्ष कारजगावर उपस्थित होते.सभेत विद्यार्थी संख्या तपासून परिक्षा केंद्र देण्यात यावे.पेपर तपासणीसाठी २०० पेक्षा अधिक पेपर देऊ नये.मॉडरेटर व केंद्र परिक्षकाचे मानधन त्वरीत देण्यात यावे.पेपर तपासणीचे काम सर्वांना समान असावे.प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठवितांना बोर्डाने खर्च द्यावे.केंद्रावर भेट देणाèया अधिकाèयाला ओळखपत्र द्यावे.प्रशासकीय काम असणारे मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक यांना पेपर संबधी कामे देऊ नये.केंद्र असणाèया शाळेतील शिक्षकांना अतिरिक्त कस्टोडीयन म्हणून पाठविण्यात येऊ नये.भुगोल विषयाच्या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकाचा समावेश करण्यात यावे तसेच केंद्रावर चित्रिकरण करण्यास मनाई करण्यात यावी आदि विषयावर चर्चा करण्यात आली.