बल्लारशा-गोंदिया रेल्वेगाडीत आढळली ४ दिवसाची मुलगी 

0
10
गोंदिया,दि.२२ः- गोंदिया रेल्वेस्थानकावर सकाळी ११ च्या सुमारास पोचलेल्या बल्लारशा-गोंदिया रेल्वगाडीच्या एका डब्यामध्ये नुकतेच जन्माला आलेले अर्भक आज(दि.२२) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.प्लेटफार्मक्रंमांक १ वर गाडी आल्यानंतर सर्व प्रवाशी उतरले.त्यानंतर काही वेळातच प्लेटफार्मवर सफाईकरीत असलेल्या एका सफाईकामगारास रेल्वेच्या डब्यातून लहान बाळ रडत असल्याचे आवाज आले असता बघण्यास गेला.तेव्हा दोन तीन दिवसापुर्वीच जन्माला आलेली मुलगी कुणीतरी सोडून गेल्याचे लक्षात आले.लगेच सफाई कामगार विक्की महावतने रेल्वेप्रशासन व चौकशी विभागाला माहिती दिली.त्यानंतर रेल्वे पोलीस उपनिरिक्षक वानखेडे यांनी सदर मुलीला महिला शिपायासोबत ताब्यात घेत गंगाबाई रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात दाखल केले आहे.याप्रकरणात रेल्वे पोलिसांनी तपास सुरु केला आहे.