केमिस्ट अँड ड्रगिस्ट भवनामध्ये जी. एस. टी. कार्यशाळा संपन्न

0
17

नांदेड,दि. २२ : :नांदेड येथील केमिस्ट अँड ड्रॅगिस्ट भवन मध्ये एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .प्रमुख वक्ते सी. ए. विजय मालपाणी यांच्या हस्ते धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.अंत्यत किचकट वाटणारा जी. एस. टी. आणि त्याचे स्वरूप विषय मालपाणी यांनी सहज व सोप्या पद्धतीने विषद केला.सप्लाय मेमो कसा असावा, त्यात सरकारला अपेक्षित गोष्टी, डिस्काउंट व अन्य स्कीम बद्दल काय नियोजन असते,रिव्हर्स चार्ज मेकानिजम केव्हा व कोठे लागू होते.तसेच आय टी सि घेण्यास कोण पात्र व अपात्र आहे,ई. वे बिल केव्हा करावे,तसेच सेल्स रिटर्न व एक्सपायरी,ब्रेकेज चे क्रेडिट नोट – डेबिट नोट कसे असावे,अशा अनेक महत्वपूर्ण मुद्यावर मालपाणी यांनी मार्गदर्शन केले. औषधी विक्रेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकाचे त्यांनी समाधानही केले.सचिन सक्करवार यांच्या पुढाकाराने व नवीन कार्यकारणीच्या संमतीने ही कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक गंजेवार व सचिव संतोष दंमकोंडवार यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले तर कार्यशाळेचा समारोप प्रोजेक्ट चेअरमन सचिन सक्करवार यांनी केले.या कार्यशाळेला शेकडो औषधी विक्रेते उपस्थिती होते.