खमारीजवळ ट्रक ट्रक्टरच्या अपघातात दोन ठार

0
8

गोंदिया,दि.23ः- गोंदिया-आमगाव राज्यमार्गावरील खमारीगावाजवळील नाल्याजवळ आज बुधवारला सकाळी 8 वाजेच्या सुमारास झालेल्या ट्रक(एमएच 35,के 2772)  व ट्रक्टर(एमएच 35,एजी 1281)च्या अपघातात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना घडली.तर 1 गंभीर जखमी असून मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मृतामध्ये ट्रक्टरचालक मोरेश्वर हिरालाल कटरे(वय 28) व हमाल प्रविण कुंभरे यांचा समावेश आहे.  घटनास्थळावरील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकमध्ये लोखंडी सळाखी होत्या तर ट्रक्टरमध्ये वाळू होती.नाल्याजवळथोडा वळणरस्ता असल्याने या ठिकाणी दोन्हीच्या चालकाचे नियत्रण सुटले आणि ट्रक्टरच्या इंजिनवर ट्रकआढळला त्या अपघातात ट्रक्टरवरील दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. नाल्यावरील भागात ट्रक हा अर्धा झुकलेला असून ट्रक्टरचा  इंजिन पुर्णत क्षतिग्रस्त झालेला आहे.जखमी राजेंद्र भोंडेला शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नारनवरे आपल्या ताप्यासह घटनास्थळी पोचले असून मार्गावरील वाहतुक सुरळीत केली आहे.मृतांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा केटीएस रुग्णालय व शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.