संघी टाॅपर्स अवॉर्ड समारोह ४ फेब्रुवारीला

0
8

आमगाव,दि.24 : संघी परिवार गोंदियातर्फे आमगाव तालुक्यातून प्राविण्य प्राप्त विद्याथ्र्यांना दरवर्षी संघी टाॅपर्स अवॉर्डने गौरविण्यात येते.यंदादेखील या पुरस्काराचे वितरण शिक्षण महर्षि लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त ४ फेबु्वारीला भवभूती महाविद्यालय, आमगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्राविण्य प्राप्त विद्याथ्र्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे.संघी टॉपर्स अवॉर्डसाठी लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आमगावची विद्यार्थिनी कु.मनिषा पांडुरंग बिसेन (८६ टक्के गुण), लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ एज्युकेशन बी.एड.आमगावची कु. प्रीती सतबीर सिंग (७७.७१ टक्के गुण),डी.टी.एड.ची रोशनी भास्कर बहेकार (८५.४० टक्के गुण),लक्ष्मणराव मानकर प्रायवेट आय.टी.आय. फिटर शाखेतून अनमोल बालकदास ढोके,लक्ष्मणराव मानकर कॉलेज ऑफ पॉलीटेक्निकची भाग्यश्री नंदकिशोर बोपचे, विद्यानिकेतन कनिष्ठ महाविद्यालयातून १२ वीची विद्यार्थिनी गौरी पवन कटरे (९६ टक्के),तर १० वीमध्ये आदर्श विद्यालयाची ट्विंकल दयाराम बागडे (९७ टक्के),भवभूती महाविद्यालयातून बी.एस्सी. शाखेतून शेफाली मुकेश छाबडा (७९.६० टक्के),एम.एस्सी. शाखेतून देवेश होकटूलाल उके (७१.९० टक्के गुण) यांची निवड करण्यात आली आहे.सर्व विद्याथ्र्यांचा ४ पेâबुव्रारीला शिक्षण महर्षि लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारंभात संघी टॉपर्स अवॉर्ड, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र,पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.कार्यक्रमाला विद्यार्थी, पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केशवराव मानकर, सुरेशबाबू असाटी, प्राचार्य डी.के. संघी यांनी केले आहे.