आसंगी तुर्क जि.प शाळा कबड्डी संघ जिल्ह्यात प्रथम

0
28

संख , दि. २४ : आसंगी तुर्क (ता.जत ) येथील जि.प.सांगली प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने तीन दिवस शालेय क्रीडा स्पर्धा पार पडल्या.यामध्ये कबड्डी मोठा गट इ.६ वी ते ८ वी या गटामध्ये आसंगीतुर्क जि.प.प्राथमिक मराठी शाळा जतच्या संघाने कवठेमहांकाळच्या गटावर २ गड्यांनी विजय मिळवून जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावला.यासाठी विशेष प्रयत्न करणारे शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक .मनोज खोकले शिक्षक संतोष राठोड,सुधाकर संग्रामे ,नामदेव जानकर ,विलास मेंडके, सुनिल साळवे ,विलास चिकुर्डेकर ,.मल्लिकार्जून माळी ,रविंद्र गद्याळ सर यांचे मार्गदर्शन लाभले.कु.प्रज्ञा शिंदे कु.कल्पना नरुटे कु.रुतुजा करे कु.समरिना मुजावर कु.ज्योती कोडग कु.सृष्टी पवार कु.आरती चव्हाण कु.कोमल करे कु.सुप्रिया लेंगरे कु.मोनिका शिंगाडे कु.सोनाली शिवशरण कु.सारिका पांढरे या खेळाडूंचा समावेश होता.सर्व विजयी संघातील विद्यार्थीनींचे व मार्गदर्शकांचे शिक्षणाधिकारी श्रीमती निशादेवी वाघमोडे जि.प. सांगली गटशिक्षणाधिकारी ,बी.एन जगधने शिक्षण विस्तार अधिकारी ,आर.डी.शिंदे श्री.गवारी व जत पंचायत समिती कर्मचारी,केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड तालुक्यातील अनेक शिक्षकांनी,तसेच सरपंच श्रीमती वंदना शिंगाडे व ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डाॅ.एम.आर.पवार ,.पुंडलिक शिंदे ,तानाजी वाघे व समस्त नागरिकांनी अभिनंदन केले.