विद्यार्थ्यांनी अभ्यासाकड़े लक्ष द्यावे-आ. संजय पुराम

0
19
सालेकसा,दि.३१ःः विद्यार्थ्यामध्ये लपलेल्या कलेला वाव मिळावा या उद्देशाने प्रत्येक शाळा महाविद्यालयात क्रीड़ासत्र व स्नेह सम्मेलनाचे आयोजन केले जातात. या माध्यमातून विद्यार्थ्यांमधे नवीन ऊर्जेचा संचार होतो.तरीही विद्यार्थ्यांनी या सर्व कार्यक्रमानंतर आपल्या वार्षिक परिक्षेचे वेळापत्रक लक्षात ठेवून अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे विचार आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केले.ते तालुक्यातील साखरीटोला येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसमेंलनात बोलत होते.
साखरीटोला येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह सम्मेलन 25 जाने. रोजी आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्दघाटन जि.प. अध्यक्ष सिमाताई मड़ावी यांचे अध्यक्षतेखाली आमदार संजयजी पुराम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथि म्हणुन जि.प.महिला व बालकल्याण सभापती लताताई दोनोडे, तहसीलदार सी.आर.भंडारी,जि.प.सदस्य उषाताई मेंढे, सरपंच संगीताताई कुसराम, माजी समाज कल्याण सभापती श्रावण राणा,उपसरपंच पुथ्वीराज शिवनकर, तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश चुटे, सुनील अग्रवाल, डॉ. संजय देशमुख, प्रा.सागर काटेखाये, डॉ. अजय उमाटे, संजय दोनोडे, भूमेश्वर मेंढे, संतोष बोहरे, देवराम चुटे, माजी प.स.सदस्य संगीताताई शहारे, संतोष अग्रवाल, विणाताई गणवीर, ग्रामसेवक राहंागडाले, मुख्याध्यापिक व्ही. डी. मेश्राम उपस्थित होते.यावेळी नवनिर्मित शाळा  इमारतीचे लोकार्पण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन शिक्षक एस.डी. मड़ावी यांनी केले तर आभार एस.ए. आसोले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर.एस.मेश्राम, व्ही.एस. झोडे एस.एम.गोदे, एस.डी. मडावी, डी.एस. निर्वाण, टी.एस. गावडकर, यु.एस. चन्नेकर, सौ. एच. एम. जनबंधू, कु.संगीता शेंडे, डी.एम. कटरे, सी.जे.थेर, व्ही.जी.खळसीगे, टी.वाय. पवार तसेच विद्यार्थी प्रतिनिधीनी अथक परिश्रम घेतले.