देसाईगंज येथे युवा जनशक्ति संघटनेची स्थापना

0
25

गडचिरोली,दि.31ःः  जिल्ह्यातील देसाईगंज/वडसा येथे युवा जनशक्ति संघटेची स्थापना करण्यात आली आहे. सदर संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.संघटनेचे संस्थापक अध्यक्षपदी इलियास खान यांची बहुमताने निवड करण्यात आली.उपाध्यक्षपदी अब्दूल वहिद शेख, कमलकिशोर सैनी तर सचिवपदी कैलाश जनार्धन बगमारे, सहसचिव स्वप्नील बावन्कसे यांची निवड करण्यात आली.कोषाध्यक्षपदी वर्षा नांदगावे ,संघटक मंगला कौह्परे , सदस्य जाफर शेख , शहेजाद पठाण , दशरथ शेखावत ,दिगबंर नाकाडे, धनंजय तिरपुडे ,कमलेश बारस्कर आदींचा समावेश आहे. लवकर जिल्हा व तालुकास्तरावर कार्यकारीणी गठित करण्यात येणार असल्याचे खान यांनी म्हटले आहे.