धम्मज्योती सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी पुरस्काराची मानकरी

0
9

गोरेगाव,दि.15 : स्थानिक किरसान मिशन स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थिनी धम्मज्योती पुरूषोत्तम पंचभाई हीला सर्वोत्कृष्ठ विद्यार्थी पुरस्कार देण्यात आले आहे.
सदर पुरस्कार दरवर्षी स्व. दसारामजी किरसान यांच्या पुण्यतिथी निमित्त देण्यात येतो. संस्थापक अध्यक्ष डॉ. नामदेवराव किरसान यांच्या हस्ते सदर पुरस्कार देण्यात आले. धम्मज्योतीचे प्राचार्य डॉ. विनोद उके, वर्ग शिक्षक बी.डी. फाये, सुभाष चुलपार, सचिन रामटेके, धमेन्द्र राऊत सह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले आहे.