रामपूर जंगलातील कोंबडा बाजारावर आंधळगाव पोलिसांची धाड ; पाच आरोपीला अटक

0
30
नितीन लिल्हारे
 मोहाडी,दि.१८:, तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या रामपूर जंगलात कोंबडा बाजारावर धाड टाकून आंधळागाव पोलीसांनी ३७१० हजाराचा मुद्देमाल व दोन कोंबड्या हस्तगत केला आहे. मात्र कोंबड बाजार सुरू असलेल्या ठिकाणावर आंधळगाव पोलिसांनी धाड टाकताच तेथील कोंबड बाजार शौकीन सैरा वैरा पडू लागले, तुमसरचे पोलीस उपविभागीय विक्रम साळी यांच्या हद्दीत सुरू असलेल्या कोंबडा बाजारावरील ही आंधळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई असून कोंबड बाजार शौकीन यामुळे चांगलेच गोचित सापडले आहे.
आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या रामपूर जंगल परिसरात कोंबड्यांवर झुंज लावण्याचा बाजार भरत असल्याची गुप माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे, पी.एस.आय. गेडाम, सहायक फौजदार दीक्षित,पो.शि. चव्हाण, पोलीस शिफाई लोकेश सिंगाडे, पो.शि. ब्राम्हण आदींना रामपूर जंगल परिसरात शोध घेण्यासाठी पाठविले असता, रामपूर(गायमुख) जंगल परिसरात रविवार सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कोंबड्यांची झुंज लावण्याचा बाजार भरला होता. आंधळगाव पोलीस पथक बाजार भरत असलेल्या ठिकाणी पोचताच एकच पळापळ सुरू झाली. यात द्यानेश्वर उपसराव मोहतुरे वय २१ वर्ष, मनोज नीलकंठ धोडस वय ३८ वर्ष, शुभम अनमोल देवगडे वय २० वर्ष, राजेश सत्यवान देवगडे वय ३९ वर्ष वरील सर्व राहणार माडगी, पंकज रमेश अडकणे वय ३३ वर्ष रा. आंबेडकर नगर तुमसर, सदर मुद्देमाल जप्त व आरोपीला अटक करण्यात आले.
पाच लोकांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. मात्र झुडपी जंगलाचा फायदा घेत इतर जुगार खेळणारे पळून गेले. या कारवाईत आंधळगाव पोलीसांनी ३७१०/-रूपये व दोन कोंबडे मुद्देमाल हस्तगत करीत आरोपी यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.या कारवाई मुळे कोंबडा बाजार शौकीनांचे चांगलेच धाबे दणाणले असून झुडपी जंगलाचा साथ घेऊन कोंबडा बाजार शौकीन आपला शौक पूर्ण करीत कोंबडयाची झुंज लावून त्यावर बक्कड पैसा लुटवित असतात त्यावर अशा प्रकारच्या धाडीने अशा शौकिनाना चाप बसला आहे. मात्र याच रामपूर, आंबागड परिसरात अवैध गाय, बैल, म्हशी आशा अनेक जनावरांची कोंडी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे मात्र याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे. गायमुख यात्रा सुरु होणार असून भंडारा पोलीस अधीक्षक विनिता शाहु या मार्गावर होणारे अवैध वाहतूकिला आळा घालतात काय याकडे कोणती कार्यवाही करतात याकडे लक्ष वेधले आहे. एकीकडे कार्यवाही दुसरीकडे गायमुख मार्गाने अवैध जनावरांची वाहतूक होत आहे. कोंबडा बाजार धडक कार्यवाही करत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय इंगळे व सहकारी करीत आहे.