बसपा राज्यात सर्व ४८ जागा लढविणार-खा.अशोक सिध्दार्थ

0
21

भंडारा,दि.19ः-लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी संपूर्णताकतीने पुढे येणार असून राज्यातील सर्व ४८ जागा लढविणार आहे, अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी खा. डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक लोकसभा क्षेत्राची चाचपणी केली जात आहे. भंडारा जिल्ह्यात बसपाचे संघटन चांगले असून निवडणुकीसाठी पोषक वातावरण आहे. शेतकर्‍यांची समस्या, बेरोजगारी आदी मुद्दयांवर ही निवडणूक लढली जाणार आहे. लोकसभेच्या उमेदवारासाठी तीन दिवसांपूर्वी नागपूर येथे बैठक घेण्यात आली. भंडारा लोकसभेसाठी इच्छुक तीन नावे पक्षाकडे आली असून त्यावर चर्चा सुरू आहे. राज्यातील सर्व ४८ जागा लढविण्याचा मानस असला तरी किमान १0 जागांवर अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्यातील अधिकाधिक जागा आम्ही जिंकू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. बसपाने अद्याप कोणत्याही पक्षाशी युती केली नसली तरी राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांच्या निर्देशानुसार पुढील रणनिती ठरविली जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी मुख्य मार्गदर्शक प्रमोद  रैना,प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे,एड संदिप ताजने,कृष्णाजी बेले,प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार,ज़ितेंद्र मेसकर,उषा बौद्ध,दिलीप मोटघरे,जागेश बांगर,जिल्हा अध्यक्ष डाॅ.राजेश नांदुरकर,रोशन बंसोड,डाॅ.नांदेश्वर,राजविलास गजभिये, अनिल कुरिल, संजय नासरे, मुकेश धुर्वे, शंकर भेंडारकर, डाॅ.संघरतने, प्रियताई शाहारे, रेखा भुसारी,डाॅ.विजया ठाकरे नांदुरकर, चन्द्रमनी गोंडाने,सलिम खान पठान, रोहित डाहाट उपस्थित  उपस्थित होते.