रानडुकराची शिकार; तिघांना अटक

0
83

सावली,दि.21ःःतालुक्यातील राजगडाच्या शेतशिवारात सोमवारी दुपारी वन्यप्राणी रानडुकर व रानमांजरची कुत्र्याच्या मदतीने शिकार केल्याचे आढळून आल्याने तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.रानडुकर व रानमांजरचे मांस भाजून शिजवत असल्याची गोपनीय माहिती उमेश सिंह झिरे व सावली वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे व वनविभाग पथकांनी धाड टाकून रानडुकर अंदाजे १५ किलो व रानमांजर ३ किलो मांस व विळा, कुर्‍हाड व इतर साहित्य जप्त करण्यात आले. पी.ओ.आर मोका पंचनामा व जप्तीनामा नोंदवून आरोपींना ताब्यात घेतले. रानडुक्कर बोरचांदली येथील रवींद्र खुटांवार यांच्या शेतात, तर रानमांजर राजगड येथील मारकवार यांच्या शेतात शिकार केल्याचे सिद्ध झाले.
साईनाथ गंगाराम मेटपल्लीवार, अशोक मेटपल्लीवार, सोमनाथ गंगाराम मेटपल्लीवार अशी आरोपींची नावे असून, यांनी यापूर्वीसुध्दा वन्य प्राण्यांचे शिकार केल्याचे बयानातून स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांची चंद्रपूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. पुढील तपास जी. व्हि . धाडे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही. सी. धुर्वे , वनक्षेत्र सहायक करीत आहेत.
यात भोयर क्षेत्र सहायक पेंढरी,व्ही जी चौधरी, राकेश चौधरी, वासेकर गायकवाड वनरक्षक,पंकज दुधे यांनी सहकार्य केले.