पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी

0
11

गोंदिया,दि.21:  मनोहरभाई पटेल अकादमीच्यावतीने दिशा फाऊंडेशन,धोटेबंधु विज्ञान महाविद्यालय व नमाद महाविद्यालयाच्या सयुंक्तवतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल व मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मधुमेह तपासणी व जागरुकता कार्यक्रमात 240 जणांची तपासणी करण्यात आली.धोटे बंधु विज्ञान महाविद्या लयाच्या सभागृहात आयोजित या आरोग्य शिबिराला खासदार पटेल व श्रीमती पटेल,माजी आमदार राजेंद्र जैन यांनी भेटही दिली.या कार्यक्रमाला‘ डायबिटीज केअर अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर’ नागपूरचे संचालक  व मधुमेह विशेषज्ञ डॉ. सुनिल गुप्ता, डॉ. कविता गुप्ता तसेच दिशा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. देवाशिष चॅटर्जी उपस्थित होते.

यावेळी तज्ञ डॉक्टरांमार्फत २४० जणांची मधुमेह तपासणी करण्यात आली. यातील ३४ व्यक्तिंना मधुमेह असल्याचे सिध्द झाले. याप्रसंगी ‘डायबिटीज केअर रिसर्च सेंटर नागपूरचे मधुमेह विशेषज्ञ डॉ.सुनिल गुप्ता यांनी मधुमेहाचे प्रकार,दुष्परिणाम तसेच त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. डॉ. कविता गुप्ता यांनी मधुमेहाशी संबंधित आहारविधी, दिनचर्या तसेच घ्यावयाची काळजी यासंबंधी विस्तृत माहिती दिली.डाॅ. देवांशी चॅटर्जी यांनी दिशा फाउंडेशनच्यावतीने २१ वर्षापासून जिल्हयातील आदिवासी भागासह इतर भागात चालविल्या जाणार्या विविध आरोग्य कार्यक्रमाची माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अंजन नायडू यांनी तर संचालन डॉ. जे.जी. महाखोडे यांनी केले.आभार डॉ. डी.एस. चैधरी यांनी मानले.