लमाणतांडा येथे जय सेवालाल महाराज जयंती साजरी

0
25

जत(-राजभक्षर जमादार),दि.२१~~जत येथिल दरिबडची येथील लमाणतांडा येथे जय तुळजाभवानी सार्वजनिक वाचनालय लमाण तांडा यांच्या वतीने जयसेवालाल महाराज यांची 280 वी जयंती साजरी करण्यात आली.सत्याचे आचरण करा.आपल्या मुलांना उत्तम शिक्षण द्या.समाज प्रगतीचे महत्वाचे साधन शिक्षण आहे.आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा.दारू सारखे व्यसन समाजातून हद्दपार करा आणि समाजातील तरुणांनी वेसन्मुक्त राहण्याचा संकल्प करावा.समाजातील सुशिक्षित लोकांनी पाठीमागे राहिलेल्या बांधावकडे लक्ष देऊन निरीक्षरतेचे समूळ उच्चाटन करावे.संत सेवालाल महाराजांनी सांगितलेल्या मार्गावर समाजानी मार्गक्रम करावे.असे शाम राठोड या प्रसंगी म्हणाले.

संतांचे विचार समाजाला दिशादर्शक आहेत. लोकांनी भोंदूगिरी,अंधश्रद्धेपासून दूर राहावे.संतांना, थोर समाजसुधारकाना,थोर व्यक्तींना वाटून घेतल्यासारखे त्यांची जयंती विशिष्ट व्यक्तींनीच साजरी करणे.लोकहिताचे होणार नाही.तर सर्वच जाती धर्मातील व्यक्तींनी सर्व संत आणि थोर व्यक्तीची जयंती साजरी करावी.थोर संत,महापुरुषांनी सांगितलेल्या मार्गाने चालावे यातच राष्ट्रहित आहे.
असे आनंद कांबळे यांनी विचार मांडले. प्रत्येक वर्षी एक वृक्षारोपण आणि 100% संवर्धन करण्याचे ठरले सदर वृक्ष सरपंच शांताबाई मोतिसिंग राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.सदर वृक्षाची 100% संगोपन करण्याची जबाबदारी लालू चंदू राठोड यांनी घेतली यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष शिवाजी राठोड त्याचे आभार व्यक्त केले.

यावेळी दिलीप वाघमारे,सचिन राठोड, प्रकाश राठोड, फुलसिंग राठोड व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.सुञसंचलन राहुल राठोड तर प्रास्तविक व आभार जय तुळजाभवानी सार्वजनिक लमाणतांडा चे अध्यक्ष शिवाजी राठोड यांनी केले.