विज्ञान हा मानवाचा अविभाज्य घटक – प्रा सौ सरिता बोधाने

0
18

लाखनी,दि.28ः- राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारे संचालित समर्थ विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात आज सी व्ही रमण यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान दिन विज्ञान प्रश्न मंजुषा, वाद विवाद स्पर्धा, स्मरणशक्ती आणि विज्ञान प्रदर्शनी अशा स्पर्धा आयोजित करून साजरा करण्यात आले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत २०० विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून यात प्रथम वेदिका सिंगाडे, द्वितीय आफियानाज अन्सारी यांना प्रशिस्त पत्र आणि बक्षीस देऊन गौरविण्यात आले. भारतीय सैनिकांचे आत्मसंरक्षण करण्यासाठी विज्ञान सक्षम किंवा असक्षम याविषयावर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली यात प्रथम वैष्णवी वलथरे व द्वितीय प्राची गिर्हेपुंजे यांनी स्थान पटकावले. विज्ञान समरणशक्ती स्पर्धेत प्रथम श्रुती शेंडे व साकीब सिद्दीकी यांनी तर विज्ञान प्रदर्शनी आर्यन हारोडे, द्वितीय साकेत नंदेशवर, तृतीय कु आकांशा कुंभारे यांना बक्षीस देण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून प्रा सौ सरिता बोधाने, अध्यक्षस्थानी प्राचार्य दा ई प्रधान व प्रमुख पाहुणे म्हणून किशोर आळे, प्रा विकास खेडीकर, विज्ञान शिक्षक प्रा सतीश भोवते, अनिल बडवाईक होते. आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोधाने म्हणाले की, विज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे. आपल्याला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत विज्ञानाच्या कार्यक्षेत्रातून जावे लागते. विज्ञान कशाप्रकारे वैश्विक आहे याचे उदाहरण सांगताना त्या म्हणाले की, विज्ञानाचे प्रयोग हे व्यक्ती स्थान काळ बदलत नाही आज आपण भारतात एकादे प्रयोग केले आणि तेच अमेरिकेत केले तरी त्याची सिद्धता सारखीच असते. विज्ञान दिन हे प्रयोग करून साजरे केले जात आहेत हे बघून मला आनंद वाटला असे ते बोलत होते.या कार्यक्रमाचे संचालन प्राची गिर्हेपुंजे यांनी तर आभार प्रा सतीश भोवते यांनी मानले.