विशेष मतदार नोंदणी कार्यक्रमात संधीचा लाभ घ्या: डॉ.बलकवडे

0
26
2 व 3 मार्च रोजी 1281 मतदान केंद्रावर कार्यक्रम
गोंदिया,दि.01 मार्च: मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरीकांना मतदारन यादीमध्ये नोंदणी करता यावी यासाठी शनिवार दिनांक 2 मार्च व रविवार दिनांक  3 मार्च 2019 रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तरीही ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, अशा नागरीकांना आणखी एक संधी भारत निवडणूक आयोगाकडूण देण्यात आली आहे. तसेच जिल्हयातील 1281 मतदान केंद्रावर सदर कार्यक्रम राबविण्यात येणार असून या संधीचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादम्बरी बलकवडे यांनी केले आहे.
           मतदार नोंदणी संदर्भातील विशेष कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी यांनी सर्व राजकीय पक्ष तसेच निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी आयोजित करण्यात आली. दिव्यांग मतदारांना या विशेष मोहिमेचा लाभ घेण्यासाठी विविध संस्थेचे प्रतिनिधी सुद्धा बैठकीत उपस्थित होते. सदर बैठकीत या पूर्वी  दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2019 (शनिवार व रविवार) रोजी जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर विशेष मोहिमेंतर्गत पात्र मतदारांसाठी  मोहिम राबविण्यात आली होती. सदर मोहिमेंतर्गत 5 हजार पाचशे अठ्ठावन अर्ज प्राप्त झाले आहेत. सदर मोहिमेंतर्गत मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 अर्ज 3855, मतदार यादीतील नावात आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना 7 अर्ज 558, मतदार यादीतील नोंदीच्या तपशीलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी नमुना 8 अर्ज 1034 तथा मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना 8 अ अर्ज 111 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली.
           दिनांक 1 जानेवारी 2019 या आर्हता दिनांकावर आधारीत प्रसिध्द अंतिम मतदार यादीत नाव नसलेल्या सर्व पात्र नागरीकांनी विशेष  मतदार नोंदणी मोहिमेदरम्यान आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जावून आपले नाव मतदार यादीत नोंदविता येईल. तसेच जांच्याकडे मतदान ओळखपत्र आहे, त्यांनीही  आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन घ्यावी. मतदारांचे नाव मतदार यादीत आहे किंवा नाही या बाबत खात्री करणे गरजेचे अल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच ते म्हणाल्या की जरी ओळखपत्र मतदारांकडे असले तरी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे, तेव्हाच मतदानाचा अधिकार मतदाराला प्राप्त होणार आहे. मतदार यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे शिबिरमध्ये उपलब्ध राहणार असून मतदार यादीत नाव नसल्यास या मोहिम कालावधीत मतदार यादीत नाव नोंदवावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे. तसेच काही अडचण असल्यास 1950@ या टोल फ्री क्रमांकावर आणि www.nvsp.in  तसेच  www.ceo.maharashtra.govt.in या सांकेतीक स्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.