पोलीस अधिक्षक विनीता साहूंनी स्विकारला पदभार

0
19

गोंदिया,दि.02 ः- गोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षक पदाची सुत्रे नवनियुक्त पोलीस अधिक्षक विनीता साहू(भा.पो.से.) यांनी २८ फेब्रुवारीला पोलीस अधीक्षक हरीष बैजल यांच्याकडून स्विकारला.हरिष बैजल यांची धुळे येथील राज्य राखीव दल क्रमांक 6 च्या समादेशक पदावर बदली झाल्याने त्यांची जागेवर भंडारा येथील पोलीस अधिक्षक विनीता साहू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मावळते पोलीस अधिक्षक बैजल यांनी त्यांना पुढील वाटचालीस मनः पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात विनीता साहू या पहिल्या महिला पोलीस अधिक्षक ठरल्या आहेत.सध्या जिल्हाधिकारी ही महिला आहेत त्याच कळीत महीला पोलीस अधिक्षक जिल्ह्याला लाभल्याने महिला सक्षमीकरणाच्या वाटेवर जिल्ह्याची वाटचाल सुरु झालेली आहे.साहू यांच्या स्वागतासाठी सर्वचपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्तेसंह सामाजिक संस्थाचे पदाधिकारी पोलीस अधिक्षक कार्यालयात पोचून त्यांचे अभिनंदन करु लागले आहेत.