प्रतापगडावर मा.खासदार पटोलेंसह वर्षा पटेलांनी घेतले महादेवाचे दर्शन

0
29

अर्जुनी मोरगाव,दि.04 : नवसाला पावणारा शिवशंकर अशी सर्वदूर ख्याती असलेल्या पूर्व विदर्भातील प्रतापगड येथे आज सोमवारी (दि.४) महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त भक्तांची अलोट गर्दी झाली असून भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार नानाभाऊ पटोले व मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्षा वर्षा पटेलांनी महादेवाचे दर्शन घेत पुजाअर्चना केली.त्यानंतर मनोहरभाई पटेल अकादमीच्यावतीने आयोजित महाप्रसाद वितरण कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली आहे.माजी खासदार पटोले मित्रपरिवराच्यावतीनेही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी मनोहर चंद्रिकापुरे, लोकराम गहाणे,किशोर तरोणे,राजू एन.जैन,उध्दव मेहंदळे,मंजू चंद्रिकापुरे,राजू पालीवाल,दामोदर नेवारे,अशोक चांडक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड हे हिंदू-मुस्लीम जनतेच्या ऐक्याचे प्रतिक आहे. हिंदू भाविक हे महादेवाचे तर मुस्लिम बांधव हजरत ख्वाजा उस्मान गणी हारुणी यांचे दर्शन घेतात. एकाचवेळी हिंदू मुस्लीम भाविक येत असल्याने येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा रविवारपासूच करण्यात आली आहे.प्रतापगड यात्रेच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी गावाबहेर वाहने अडविली जात असून लाबंच लांब रांगा वाहनाच्या लागल्या आहेत.भाविकांना बरेच अंतर पायपीट करीत महादेवाच्या दर्शनासाठी मार्गक्रमण करावे लागत आहे.
ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. गैरकृत्य करणाऱ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी सीसी टिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंगळवारी (दि.५) दुपारी ३ वाजता शाही संदल प्रमूख मार्गाने मार्गक्रमण करीत ख्वाजा उस्मान गणी हारूनी यांच्या दर्ग्यावर पोहचेल. रात्री ९ वाजता कव्वालीचे आयोजन केले आहे.यावेळी सीमा सदू ताज, किरण जोशी (अमरावती), अनूज जाफर (बालाघाट) अंतू झकास, मनोज पाराशर (वाराशिवणी), युसूफ सागर (भिलाई) उपस्थित राहणार आहेत. हाजी अब्दूल मजीद शोला व मुंबईचे जाहिद नाजा यांची कव्वाली होणार आहे.गुरूवारी सकाळी ९ वाजता लंगर (महाप्रसाद) वितरण होणार आहे.