प्रोग्रेसिव्ह शाळेत मराठी भाषा दिवस उत्साहात

0
20
गोंदिया,दि.04 : श्रीमती उमाबाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था गोंदिया व्दारा संचालित प्रोग्रेसिव्ह मराठी शाळेत ज्ञानपीठ विजेता कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी. तितिरमारे हे होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून सविता बेदरकर, प्रा. दिशा गेडाम, संस्थाध्यक्ष डॉ. पंकज कटकवार, डॉ. नीरज कटकवार, प्राचार्य ओ.टी.रहांगडाले, वीणा कावळे, निधी व्यास, वर्षा सतदेवे उपस्थित होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यार्थी कवी कुसुमाग्रज यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य व त्यांनी लिहिलेल्या कविता गायन करून उपस्थित मान्यवरांचे मन मोहून घेतले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की मराठी भाषेचे जतन केले पाहिजे, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी बोलता आली पाहिजे, अशा प्रकारे विद्यार्थ्यांना संबोधित केले व उत्कृष्ट पथनाट्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य कुमुदिनी तावाडे, वाय.आशा राव, तुमेशी पारधी, अनित पटले, वंदिता हेमणे, कविता भांडारकर, सुशीला भोयर, मंगला राणे, पुस्तकला पुंष्ठडे, नितीन पशिने, वैशाली वैद्य, जयश्री दमाये, गुरूदास भेलावे, राहुल रामटेके, दिव्यांशू जैस्वाल यांनी परिश्रम घेतले.