कारंजा शाळेत बाल आनंद मेळावा व शैक्षणिक प्रदर्शनी मेळावा

0
80

गोंदिया,दि.06ः-विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व शैक्षणिक गुणवत्ते बरोबर व्यवहारीक ज्ञानात भर पडावी म्हणून आज जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक डिजिटल शाळा कारंजा येथे बाल आनंद मेळावा व शैक्षणिक प्रदर्शनी मेळावा आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी होमीओपॅथिक आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच धनवंता उपराडे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य  योगराज उपराडे, उपसरपंच  महेन्द्र शहारे, केंद्र प्रमुख एन बी कटरे, शा व्य स. अध्यक्ष देवानंद गराडे, मुख्याध्यापक एल.यु.खोब्रागडे, सदस्य सर्वश्री कपील हरडे, लिखीराम बनोठे, माजी उपसरपंच मडावी, डाॅ. अलोणे, विजय बनोठे, सदस्या रेवंता मडावी, वनिता खेडीकर, रजनी सरजारे, सेवानिवृत्त शिक्षक तारे प्रामुख्याने उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक एल.यु.खोब्रागडे यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून मेळाव्याचे महत्व व शैक्षणिक प्रदर्शनीबद्दल सविस्तर माहिती दिली.विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बरोबर विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास, व विविध उपक्रमांत अग्रगन्य शाळा म्हणून कारंजा शाळा नावारुपास आली आहे. विद्यार्थ्यांनी या पुरेपूर फायदा घेऊन आपला भविष्य उज्ज्वल करावे अशा शब्दांत मार्गदर्शन करून मुख्याध्यापक व शिक्षकांचे कौतुक केले.पं स. सदस्य योगराज उपराडे यांनी आठवा वर्ग उघडण्यासंबधी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन एम.टी.जैतवार  यांनी केले तर आभार के.जे. बिसेन यांनी मानले.यशस्वीतेसाठी जी. बी. सोनवाने, एम. एम. चौरे, नरेश बडवाईक,रुद्रकार, पुजा चौरसीया, संगीता निनावे, वर्षा कोसरकर, वनिता भिमटे, युगेश्वरी ठाकूर, गावकरी मंडळी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.