ग्राम पंचायत कातुर्लीच्यावतीने दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेश वाटप

0
24

आमगाव,दि.07ः- तालुक्यातील ग्रामपंचायत  कातुर्ली अंतर्गत दिव्यांग  लाभार्थ्यांना धनादेश वितरण कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या सभागृहात आज(दि.7) करण्यात आले. ग्राम पंचायतच्या पांच टक्के राखीव निधीतून शासन निर्णयातील तरतुदीनुसार लाभार्थी यांना सहाय्यभूत उपकरणे खरेदी करण्याकरीता सहायक अनुदान स्वरुपात एक हजार याप्रमाणे  30 लाभार्थ्यांना तीस हजार रुपये सरपंच केशरीचंद बिसेन व सचिव कमलेश बिसेन यांचे हस्ते वितरित करण्यात आले.

त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण तरतुदीनुसार गावातील 3 अंगणवाडी केंद्रांना अनौपचारिक शिक्षण करीता प्रत्येकी 16 खुर्ची, 4 टेबल व एक अलमारी देण्यात आली.जिल्हा परिषद शाळेला शिक्षण सेस निधी अंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सहाय्यभूत उपकरणे खरेदीकरीता वीस हजाराचे धनादेश उपयोगिता प्रमाणपत्र घेऊन मुख्याध्यापकाना देण्यात आले.कार्यक्रमाला उपसरपंच रामलाल धोंडू दोनोडे, ग्रा.प.सदस्य सर्वश्री चुनीलाल तानु शहारे,भागवत हरीचंद बिसेन,अर्पणकुमार ढेकूलदास रामटेके,प्रीती विजय कोरे,ज्ञानवता राजेश शिवणकर,प्रमिला धनलाल जैतवार,रंजना कलतलाल फरकुंडे,पुस्तकला तेजराम भेलावे,हिरालाल लक्ष्मण बिसेन संगणक परिचालक,भेमराज श्रावण गौतम ग्रा. प परिचर,राजकुमार झाडू भेलावे पाणी पुरवठा कर्मचारी,नितेमन तुळशीराम बिसेन रोजगार सेवक उपस्थित होते.