मुख्य बातम्या:
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह# #मेंढे यांच्या मूळगावासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी# #अंकुश शिंदे सोलापूरचे नवीन पोलीस आयुक्त, तर एम. बी. तांबडें नवे नक्षलचे पोलीस उपमहानिरिक्षक# #जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान# #कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान# #वंचित बहुजन आघाडीमुळे दोन माजी मुख्यमंत्र्याना पराभवाचा फटका# #५0 हजारांची लाच स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला अटक# #निशुल्क एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम# #भारतीय सैन्यात महिला सैनिक पोलीस भरती# #खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

अहेरी-हैद्राबाद ʻशिवशाहीʼबसचा मंचेरियाल जवळ अपघात दोन ठार

गडचिरोली,दि.08(अशोक दुर्गम): गडचिरोली जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी-हैद्राबाद या ʻशिवशाहीʼ बस क्र.एम एच २९ बी इ १०३१ बसचा(दि.८ मार्च) तेलंगणा राज्यातील मंचेरियल जवळ झालेल्या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली. ७ मार्च रोजी अहेरी आगारातून ही बस सायकांळी ७ वाजेच्या सुमारास अहेरी-हैद्राबाद प्रवासाला निघाली होती. अपघात इतका भीषण आहे की बस अर्ध्याहूनअधिक चेंदामेंदा झाली आहे. तसेच या अपघातात शिवशाही बसचा वाहन चालकासह एक प्रवासी ठार झाला आहे.  माहितीनुसार अपघात झालेली शिवशाही बस क्र.एम एच २९ बी इ १०३१ चंद्रपूरहुन हैद्राबाद कडे जात होती. तर ट्रक क्र.सी जी ०७ बी एफ ९२१६ ही मंचेरियाल कडून चंद्रपूरकडे येत होता.
सदर अपघातात ६ गंभीर जखमी असुन त्यांना करीमनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे तर ७ किरकोळ जखमींना मंचेरियाल येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.घटनेबाबत माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम यांना माहिती मिळताच त्यांनी तेलंगणा येथील राष्ट्रवादी चे प्रभारी यांच्याशी संपर्क केला व मदतीकरिता जाण्याचे आदेश दिले. तसेच मंचेरियाल चे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष गोपाल झुतडी, युवराज अनपल्लीवार जिल्हा सेक्रेटरी, अली सागर यादव जि.यु.अध्यक्ष यांच्यासह २५ ते ३० कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले व अपघातग्रस्तांना रुग्णालयात हलविले.

Share