पी.डी.रहागंडाले विद्यालयात महिला दिन उत्साहात

0
17

गोरेगाव,दि.08ः-येथील पी.डी.राहांगडाले विद्यालय व लायनेस क्लब गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज 8 मार्च जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्पना चिरवतकर होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून न.प. गोरेगावच्या मुख्याधिकारी हर्षला राणे,बालविकास अधिकारी ज्योती भालाधरे,वनविभागाच्या सुरेखा बागडे, डॉ. अनिता राहुल बिसेन ,सौ.व्ही.पी.कटरे,सौ.एम.डी.राहांगडाले उपस्थित होते. संचालन सौ.मांढरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.उपरीकर यांनी मानले.या प्रसंगी होतकरू महिलांचा सत्कार करण्यात आला.त्याच प्रमाणे जागतिक महिला दिना निमित्ताने निबंध स्पर्धा घेण्यात आली.त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.अशाप्रकारे पी.डी.राहांगडाले विद्यायलात गोरेगाव महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला.