मनसेच्या वर्धापन व जागतिक महिला दिनानिमित्त फळ वितरण

0
19
सालेकसा,दि. ०९ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका शाखा सालेकसाच्यावतीने ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे आज(दि.9) पक्षाचा १३ वा वर्धापन दिवस व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिकांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.तसेच रुग्णांना फळे व बिस्कीटाचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी ग्रामीण रुग्णालय सालेकसाचे वैधकीय अधीक्षक डाॅ.पी.एस.रामटेके,महिला वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुरेखा मानकर,समुपदेशक नितिन फुलझेले, औषधी निर्माण अधिकारी सागर राठोड,जय रगडे,अधिपरिचरिका एस. डी. हुकरे, आर.बी.टेकाम,एम.जे. लांजेवार,एम.बी.वाढई,ए.जी.ठाकरे, एस. एन गव्हाडे, डी. आर. बाभरे, यू. व्ही. भट, आर. डी. बहेकार, छाया सयाम,सपना सहारे उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मनसे तालुका अध्यक्ष ब्रजभूषण बैस,उपाध्यक्ष ध्रुव हुकरे,उपाध्यक्ष दिलीप ढेकवार, शहर अध्यक्ष राहुल हटवार, विद्यार्थी सेनेचे गोल्डी भाटिया, स्वप्नील करवाडे यांनी प्रयत्न केले.