जगत महाविद्यालयात स्मृतींचे बहरले गंध

0
18

गोरेगाव,दि.१०: स्थानिक जगत कला, वाणिज्य व इं.ह.पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे वाणिज्य अभ्यास मंडळातर्फे व्याख्यान व बी.कॉम. अंतीम वर्षाचा निरोप सभारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विचारमंचावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.वाय. लंजे तर प्रमुख वक्ता म्हणून एस.एन.मोर महाविद्यालय तुमसरचे प्रा.डॉ. प्रकाश देहलीवाल तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ.एस.एच.भैरम, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.आर.एम. गहाणे, डॉ.पी.बी.जवादे प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात शारदा माता व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करुन करण्यात आली. या कार्यक्रमाची भूमिका प्रा.डॉ.आर.एम. गहाणे यांनी विशद केली. कार्यक्रमाचे औचित्य साधून बी.कॉम. अंतिम वर्षाच्या विद्याथ्र्यांनी भुतकाळातील स्मृतींना तरल शब्दात उजाळा दिला व संपूर्ण वातावरणात स्मृतींचे गंध बहरले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.एस.एच.भैरम यांनी मार्गदर्शनातून भावी जीवनाच्या वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. प्रमुख वक्ता प्रा.डॉ. प्रकाश देहलीवाल यांनी मार्गदर्शन करताना मानवी जीवनाच्या वाटचालीत वाणिज्य शाखेतील विषयांना खृूप महत्व आहे. अशाप्रकारे मौलिक विचार प्रकट केले. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य डॉ.एन.वाय. लंजे यांनी आत्मविश्वास व जिद्द मनाशी बाळगून आपले ध्येय गाठून आई-वडीलांच्या नावाबरोबर महाविद्यालयाचे नावलौकिक वाढवावे अशाप्रकारचे मौलिक विचार मांडले. सरतेशेवटी मान्यवरांचे आभार डॉ.पी.बी. जवादे ायंनी मानले. कार्यक़्रमाला प्रा.इ.व्ही.चंदनखेडे, प्रा.के.टी. खिरेकर, प्रा. संतोष मेश्राम, प्रा.पाटील, प्रा.लोकेश कटरे, डॉ. रविप्रकाश चंद्रीकापुरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन रुमेश्वरी शहारे हिने केले. यशस्वितेसाठी बी.कॉम. प्रथम वर्षाचे व द्वितीय वर्षाचे विद्याथ्र्यांनी परिश्रम घेतले.