किरसान मिशन शाळेत विज्ञान प्रदर्शनी

0
21

गोरेगाव,दि.१०: स्थानिक किरसान मिशन स्कूल व ज्युनीअर कॉलेज गोरेगाव येथे विज्ञान दिवस विज्ञान प्रदर्शनी आयोजित करुन साजरा करण्यात आला. इयत्ता नर्सरी ते ९ व्या इयत्तेतील विद्याथ्र्यांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक सहाय्यक प्राध्यापक डॉ. संजीव रहांगडाले हे होते. त्यांनी डॉ.सी.व्ही. रमन महान वैज्ञानिक व सर्व वैज्ञानिक यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. विज्ञानामुळे चौकस वृत्ती, ज्ञान व वैज्ञानिक क्षमतेचा विकास होते असे म्हटले. प्राचार्य डॉ. विनोद उके यांनी विज्ञान वरदान असून नवीन क्षमता व कौशल्ये विज्ञानामुळेच शक्त आहेतअ से म्हटले. यावेळी विज्ञान शिक्षीका ममता चौधरी, लक्ष्मी चौरसिया, के.डी. बोरकर, बी.डी. फाये, गीता जगनीत, माधुरी बघेले, सचिन रामटेके, सुभाष चुलपार, धमेन्द्र राऊत उपस्थित होते.