जि.प.अध्यक्ष व सीईओंच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

0
13

गोंदिया,दि.10ः- राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहीमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन तालुक्यातील उपकेंद्र फुलचुर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष सिमाताई मडावी  यांचे उपस्थितीत पार पडले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी,राज्य स्तरीय पर्यवेक्षकिय अधिकारी डाॅ.गोगुलवार,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अमरिश मोहबे, डॉ. वेदप्रकाश चौरागडे गोंदिया,सरपंच लक्ष्मी कटरे,सभापती माधुरीताई हरिनखेडे,माजी सभापती स्नेहा गौतम,डॉ काटोले वैदयकिय अधिकारी प्रा आ केंद्र खमारी, अर्चना वानखेडे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक,संध्या रेटर,शालीक जवनजार आरोग्य सहायक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.धाबेपवनी येथील आरोग्य केंद्रातंगर्त अंगणवाडी निलज येथे जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांच्या हस्ते पोलीओ लस पाजून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.गोरगाव तालुक्यातील कुर्हाड़ी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पिंडकेपार येथील उपकेंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उद्घाटन सरपंच दुलिचंद रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य सेविका आई.वाय. रहांगडाले, आशा सेविका चंद्रकला घासले, आंगनवाड़ी सेविका स्वर्णलता टेंभुर्णीकर उपस्थित होते.