महाराष्ट्रात 4 टप्यात लोकसभा निवडणूक,11 एप्रिल ते 19 मे पर्यंत मतदान 23 मे रोजी मतमोजणी

0
14

नवी दिल्ली,(वृत्तसंस्था)दि.10ः-लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज 10 मार्चला संध्याकाळी पाच वाजता विज्ञान भवनात आयोजित पत्रपरिषदेत केली.विशेष म्हणजे पहिल्यांदाच निवडणुक आयाेगाने बाहेर पत्रपरिषद घेतली.मुख्य निवडणुक आयुक्त सुनिल अरोरा यांनी सांगितले की महाराष्ट्रात 4 टप्यात निवडणुक होणार आहे.

महाराष्ट्रात मतदानाच्या तारखा 
11 एप्रिल 7 जागांवर मतदान
18 एप्रिल 10 जागांवर मतदान
23 एप्रिल 14 जागांवर मतदान
29 एप्रिल 17 जागांवर मतदान

गेल्या 5 वर्षात 7 कोटी मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे.10 लाख मतदान केंद्र देशात तयार करण्यात आले असून ईव्हीएम मशीनवर यावेळी उमेदवारांचे छायाचित्र असणार आहे.लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपीटी मशीन वापरण्यात येणार आहे.7 टप्यात होणार निवडणुक 23 मे रोजी होणार मतमोजणी.11 एप्रिलला पहिला टप्पा,18 एप्रिल दुसरा चरण,23 एप्रिल तिसरा चरण,29 एप्रिल चौथा चरण,6 मे पाचवा टप्पा,12 मे सहावा टप्पा आणि सातव्या टप्यात 19 मे रोजी मतदान होणार असल्याची घोषणा करीत आजपासूनच आदर्श आचारसहिंता लागू झाल्याचे म्हणाले.

पहिल्या टप्यात 91 जागेवर 20 राज्यात ,दुसर्या टप्यात 97 जागेवर 13 राज्यात ,तिसरा टप्यात 115 जागेवर 14 राज्यात ,चौथा टप्यात 71 जागेवर 9 राज्यात ,पाचव्या टप्यात 51 जागेवर 7 राज्यात ,सहाव्या टप्यात 59 जागेवर 7 राज्यात आणि सातव्या टप्यात 59 जागेवर होणार आहे.बिहार,पश्चिम बंगाल व उत्तरप्रदेशात 7 ही टप्यात निवडणुका होणार आहेत.या निवडणुकीत 90 कोटी मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.2014 च्या लोकसभा निवडणुकीत 83 कोटी मतदार होते.1 कोटी 60 लाख मतदार हे नोकरी पेशातील आहेत.2014 च्या निवडणुकीत 3870 कोटी रुपये खर्च झाले होते.रात्री 10 ते सकाळी 6 वेळेत प्रचार करता येणार नाही.तसेच स्पीकर वाजविता येणार नाही.मतदानाच्या 48 तासापुर्वी प्रचार थांबेल.तक्रारीवर 100 मिनिटात संबधित अधिकारी उत्तर देणार.दरम्यान, निवडणूक आयोगाने इव्हीएमची विश्वासार्हता वाढवण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यानुसार यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. व्हीव्हीपॅट मशीनचा सार्वत्रिक वापर करण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच इव्हीएमसोबत छेडछाड होऊ नये यासाठी प्रत्येक इव्हीएमवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच यावेळी इव्हीएम मशीनवर उमेदवाराचे छायाचित्रही लावण्यात येणार आहे.