मुख्य बातम्या:

लोकसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, शिंदे,पटोले,उसेंडी,देवरा,दत्त यांना उमेदवारी

मुंबई,दि.13 : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून येत्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 21 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा  समावेश आहे.त्यामध्ये सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील सोलापूर मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे निवडणूक लढणार आहेत. तर गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपावर आरोप करत काँग्रसध्ये दाखल झालेल्या माजी खासदार नाना पटोल यांना नागपूर मतदार संघातून उमेवारी देण्यात आली आहे. याशिवाय, उत्तर-मध्य मुंबईतून प्रिया दत्त निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघातून डॉ. नामदेव उसेंडी यांना पक्षाने पुन्हा संधी दिल्याने ते निवडणूक लढणार आहेत. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  देशातील सर्वाधिक चर्चेची निवडणुक नागपूरातील राहणार आहे.प्रधानमंत्री मोदींशी भांडण करुन भाजप सोडणारे पटोले भाजपचे केंद्रीयमंत्री व संघाचे खास कार्यकर्ते नितिन गडकरींशी दोन हात करणार आहेत.

Share