मुख्य बातम्या:

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, चार विद्यमान खासदारांना पुन्हा संधी,नगर,माढा व गोंदियावर सस्पेंस

मुंबई,दि.14 – लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली उमेदवारांची पहिली यादी आज(दि.14) पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून  प्रसिद्ध केली आहे. पहिल्या यादीत राष्ट्रवादीकडून एकूण 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.त्यात सुप्रिया सुळे,उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक या विद्यमान खासदारांसह अन्य सहा जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र विदर्भातील गोंदिया,पश्चिम महाराष्ट्रातील माढा, अहमदनगर,बीडसह अन्य जागांवरील उमेदवारीबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. तसेच हातकणंगले मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.तर अमरावतीमध्ये रवी राणा यांच्या युवा स्वाभीमानला शरद पवारांना पाठिंबा दर्शविला आहे.राष्ट्रवादीने आपल्या वाट्यातील एक जागा राजू शेट्टींकरीता सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तसेच उर्वरित नावांची घोषणा येत्या एक दोन दिवसांत जाहीर करण्यात येतील, असे पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रावादी काँग्रेसचे पहिल्या यादीतील  उमेदवार 
रायगड – सुनील तटकरे
बारामती – सुप्रिया सुळे
सातारा – उदयनराजे भोसले
बुलडाणा – राजेंद्र शिंगणे
जळगाव – गुलाबराव देवकर
परभणी – राजेश विटेकर
ईसान्य मुंबई   – संजय दीना पाटील
ठाणे – आनंद परांजपे
कल्याण – बाबाजी बाळाराम पाटील
हातकणंगले – स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा

Share