नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील चार वाहने जाळली

0
13

गडचिरोली,दि.16: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्षल कारवाया सुरुच असून, शुक्रवारला दुपारी नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलीस मदत केंद्रांतर्गत कुमटपार गावानजीक चार वाहने जाळली. जळालेल्या वाहनांमध्ये दोन ट्रॅक्टर्स, एक जेसीबी व दोन मिक्सर मशिनचा समावेश आहे. कुमटपार येथे रस्त्याचे काम सुरु असताना शुक्रवारला(दि.15) दुपारी सशस्त्र नक्षलवादी तेथे गेले. त्यांनी कामावरील मजुरांना धमकावून वाहने पेटविली. मालेवाडा पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. वाहने पेटविण्याची गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. १२ मार्चच्या रात्री नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांभिया पोलीस ठाण्यांतर्गत पुस्के गावानजीक रस्त्याच्या कामावरील चार ट्रॅक्टर्सना आग लावली होती, तर त्यापूर्वी १० मार्चला नक्षल्यांनी कोरची तालुक्यातील ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात एका शिक्षकाची गोळ्या घालून हत्या केली होती.