मुख्य बातम्या:

लोकसभा निवडणुकीला घेऊन राष्ट्रवादीची देवरीत बैठक

देवरी,दि.17ः- येत्या लोकसभा निवडणुकीला घेऊन गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तालुकास्तरीय सभा येथील अग्रेसन भवन सभागृहात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या बैठकीत बूथ सदस्य  व संघटत्माक बाबीवर चर्चा करुन आघाडी धर्माचे पालन करण्याच्या सुचना राजेंद्र जैन यांनी बैठकित दिले.बैठकीला जेष्ठ नेते माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, बाजार समिती सभापती रमेश ताराम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व जिल्हा परिषद गटातील प्रमुख पक्ष पदाधिकारी व बुथ कमिटीचे कार्यकर्ते यांनी पक्ष संघटनेसंर्दभात आपली मते मांडून येत्या काळात गावोगावी जाऊन बैठकीच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्यांचा संकल्प घेतला.यावेळी अमरदास सोनबोईर,सुमनताई बिसेन,गोपल तिवारी,बंटी भाटीया,पारबताबाई चांदेवार, मायाताई निर्वाण. हेमलता कुंभरे, नेमीचंद आंबिलकर, छोटेलाल बिसेन, भैयालाल चांदेवार, मुन्नाभाई अंसारी, नितेश वालोदे, अंतरिक्ष बहेकार, मोंटु अंसारी ,लता बडोले , वासनिकबाई यांच्यासह सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Share