नागपूर, रामटेक लोकसभा निवडणुक अर्ज स्वीकारण्यास सुरू

0
14
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नामनिर्देशन पत्र 25 मार्च 2019 ला सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकारले जातील. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र विहित नमुना 2 मध्ये संपूर्ण माहिती सादर करणे आवश्यक असणार आहे. उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक असून सदर प्रस्तावक हा संबंधित लोकसभा मतदारसंघाचा मतदार असावा. स्वतंत्र व मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षाच्या उमेदवाराकडे दहा प्रस्तावक असणे आवश्यक करण्यात आले आहे. ते देखील त्याच लोकसभा मतदारसंघातील असायला हवेत.

या शिवाय मतदार संघ राखीव असल्यास उमेदवारांना नामनिर्देशित अर्जासोबतच सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त सर्वसाधारण उमेदवारांसाठी 25,000 आणि अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारासाठी 12500 रुपये अमानत रक्कम भरणे अनिवार्य आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 25 मार्चला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या काळात तीन दिवसांची शासकीय सुट्टी असल्याने उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे.

मतदानासाठी बॅलेट पेपर जाऊन आता इव्हीएम मशीन आल्या आहेत. एका इव्हीएम मशीनवर केवळ १६ उमेदवारांचीच नावे अंकित राहू शकतील. तेव्हा एका मतदार संघात १६ पेक्षा जास्त उमेदवार असल्यास दोन ईव्हीएम मशीनचा वापर केला जाईल.
लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतात. यासोबतच अनेक अपक्षही असतात. इव्हीएम मशीनवर एकाचवेळी केवळ १६ उमेदवारांचीच नावे अंकित करता येऊ शकतात. तेव्हा १६ पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यास एका ठिकाणी दोन इव्हीएमचा वापर करावा लागणार आहे. अर्थात निवडणूक विभागाने त्याची तयारी आधीपासूनच केलेली आहे. नागपूर जिल्ह्यात पुरेसे ईव्हीएम मशीन उपलब्ध आहेत.