महिलांना संघटित होण्याची गरज : बेदरकर 

0
46
 गोंदिया,दि.18 : आज महिला सर्वच स्तरावर सामोर जात आहे. परंतु समाजात आजही काही असे नागरिक आहेत जे महिलांना समोर जाऊ देत नाही. महिलाही त्यांना घाबरून काही म्हणत नाही. महिला संघटित झाल्या तर त्यांना कोणी दाबू शकत नाही. म्हणून आज महिलांना संघटित होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी केले. .

त्या श्रीनगर येथे १६ मार्च रोजी महिला मंडळाच्या वतीने आयोजित महिलादिनी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका निर्मला मिश्रा होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ज्योत्स्ना शहारे, सविता बेदरकर, कुंदा दोनोडे, आशा पाटील, माधुरी नासरे, रेखा भरणे उपस्थित होत्या. याप्रसंगी पुलवामा येथे शहीद झालेल्या ४४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांना मासिक पाळीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन दिव्या आंबेडारे, आलोक पवार यांनी केले तर आभार कल्पना शुक्ला यांनी मानले. यशस्वितेसाठी रूपाली रोकडे, भाग्यश्री आंबेडारे, वंदना बावनकर, अश्विनी पिसे, ममता खाडे, लीला ढोमणे, चिनू रोकडे, मोनू आंबेडारे, आचल रोकडे, कोमल राऊत, श्रेया राऊत, गीता राऊत, स्वाती पवार, वर्षा रोकडे आदींनी सहकार्य केले..