पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ रोजी गोंदियात

0
23
गोंदिया,दि.३० :-भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता बालाघाट रोड टी पार्इंट, बायपास मार्ग, मरारटोली परिसरातील अटलधाम मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस, प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, भंडाराचे पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, गोंदियाचे पालकमंत्री ना. राजकुमार बडोले, महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे, गोंदिया जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, भंडारा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, शिवसेना भंडारा जिल्हाप्रमुख नरेंद्र भोंडेकर, गोंदिया जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, रिपाई(आ) चे जिल्हाप्रमुख,  माजी आमदार तसेच भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विनोद अग्रवाल यांनी केले आहे.