गडचिरोली जिल्ह्यात 164 मतदान केंद्रांवर 365 व्हिलचेअर उपलब्ध

0
11

गडचिरोली,दि.01: 12- गडचिरोली- चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी प्रशासन सज्जतेने कार्यरत असून विविध उपाययोजना करण्यात येत  आहेत. जिल्ह्यात 164 मतदान केंद्रांवर 365 व्हिलचेअर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

जिल्ह्यात दिव्यांगाना मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी प्रशासन विविध सुविधा पुरवित आहे.  अंध, मुकबधिर, शारिरीक अपंग व इतर दिव्यांगांकरीता 164 मतदान केंद्रांवर 365 व्हिलचेअर उपलब्ध असणार आहेत.  दिव्यांगांना स्वयंसेवकांकडून मतदान केंद्रावर मदत पुरविली जाणार आहे.  यासाठी एन.सी.सी., एन.एस.एस. व स्काऊट गाईड यातील स्वयंसेवकांकडून मदत घेण्यात येणार आहे.  मतदान केंद्रांवर रँम्पची व्यवस्था करण्यात आली आहे.  67-आरमोरी (एस.टी.), अंध 114, मुकबधीर 127, शारिरीक अपंग 427 इतर अन्य 35 असे एकूण 703.  68-गडचिरोली (एस.टी.), अंध 104, मुकबधीर 74, शारिरीक अपंग 469 इतर अन्य 44 एकूण 691.  69- अहेरी (एस.टी.), अंध 113, मुकबधीर 107, शारिरीक अपंग 469 इतर अन्य 93 एकूण 802.  एकूण अंध 351, एकुण मुकबधीर 308, एकूण शारिरीक अपंग 1365, इतर अन्य 172 असे एकूण 2196 दिव्यांग मतदार आहेत.

67- आरमोरी.( एस.टी) मतदान केंद्र 62 व्हिलचेअर संख्या 134, 68- गडचिरोली (एस.टी.) मतदान केंद्र 49, व्हिलचेअर 49, 69- अहेरी (एस.टी.) मतदान केंद्र 53, व्हीलचेअर संख्या 182 एकूण मतदान केंद्र 164, व्हिलचेअर 365. उपलब्ध असल्याची माहिती  जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेने दिली आहे.