राजेन्द्र पटले यांच्या उमेदवारीने वाढली निवडणूकीतील चूरस

0
23

गोंदिया/भंडारा,दि.01ः-गेल्या १५ वर्षापुर्वी शासकीय नोकरी सोडून भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विश्वासावर भारतीय जनता पक्षात सहभागी झालेले इंजि.राजेंद्र पटले हे आजही आपल्या राजकीय पुनवर्सनाची सोय करण्यातच एकाकी पडले आहेत.नोकरीसोडल्यापासून त्यांनी भाजपसाठी केलेले काम आणि सोबतच किसान गर्जेना संघटनेच्या माध्यमातून शेतकरी,शेतमजूर,बेरोजगारासांठी दिलेला लढा भंडारा जिल्ह्यातीलच नव्हे तर गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी व बेरोजगार युवक विसरु शकणार नाही.शेतकèयांच्या न्याय मागण्यासाठी दिल्लीच्या जंतरमंतरवर सर्व सामान्य शेतकèयांच्या आवाज बुलंद करणारे राजेंद्र पटले हे पहिले आंदोलक नेते ठरले होते.ते आज भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने त्यांच्याशी केलेल्या बेईमानीच्या विरोधात अपक्ष उतरुन लढा देऊ लागले आहेत.त्यांच्या या निवडणुकीतील सहभागामूळे ही निवडणुक चांगलीच चुरसीची झाली असून भाजपच्या उमेदवारापेक्षा पटलेंच्याच उमेदवारीची अधिक चर्चा सुरु झाली आहे.
निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या १४ उमेदवारात या लोकसभा क्षेत्रातील बहुसंख्य पोवार मतदाराचे प्रतिनिधीत्व करणारे ते एकमेव उमेदवार असल्याने तसेच कुणबी समाजाचे गठ्ठा मते तीन उमेदवारामध्ये विभागली जाणार असल्याने पटले यांच्या उमेदवारीला बळ प्राप्त झाले आहे.पटले यांनी मात्र आपण सर्वसामान्य शेतकरी,शेतमजुर,बेरोजगार बहुजन समाजातील लोकांचा प्रतिनिधी असल्याचे सांगत संभाजी ब्रिगेड, गोंडवाना गणतंत्र पार्टी,युवा स्वाभिमानी, प्रहार या संघटनेच्या वतीने जाहिर पाqठबा मिळाल्याचे म्हटले आहे.या संघटनांच्या पाठिब्यांने पटलेंची बाजू जमेची झाली असून सध्याच्या घडीला या मतदारसंघातील लढत ही भाजप-राँका-अपक्ष व बसप अशी चौरंगी स्थितीत आली आहे.बसपच्या उमेदवार महिला असल्याने आणि त्या १४ उमेदवारामध्ये एकमेव महिला असल्यानेही पुन्हा चुरस निर्माण झाली आहे.
राजेन्द्र पटले किसान गर्जना या शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून या पूर्वी त्यांनी भंडारा जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून काम करित असतांना शिवसेना तसेच किसान गर्जना संघटनेला बळकट केले होते.भंडारा जिल्ह्यात नरेश डहारे यांच्या नंतर गावागावापर्यंत शिवसेना कुणी पोचविली तर ती राजेंद्र पटलेंच्याच नावावर येते.२०१४ मध्ये तुमसर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवून सुमारे ३६ हजार मते सुध्दा त्यावेळी घेतली होती.शेतकè य ा च् य ा हितासाठी सातत्याने लढा देणारे नेते म्हणून त्यांची ओळख असून जिल्ह्यात भाजप व शिवसेनेची यूती झाली असली तरी कार्यकत्र्यांची मने अद्याप जुडलेली नसल्याने नाराजशवसैनिकांची ही साथ राजेन्द्र पटले यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पटले यांना लोकसभेत उमेदवारी देणार असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते त्यामुळेच ते या आश्वासनावरच भारतीय जनता पक्षात गेले.मात्र पक्षाने त्यांना उ म े द व ा र ी नाकारली व त्यांनी बंडखोरी केली त्यांच्या या बंडखोरीला भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उघडपणे सोबत येणार नसले तरी राजेन्द्र पटले यांना साथ देत त्यांच्या कार्याला शोभेल अशा निवडणुक चिन्ह असलेल्या ट्रक्टरला कितीप्रमाणात चालवितात यावरच खरी रंगत अधिक रंगणार आहे.