तहानलेल्या मान आदिवासी आश्रमशाळेला मिळाला मदतीचा हात

0
22
शेखर भोसले/मुलूंड,दि.02ः- कडक उन्हाळ्यात विहिरीचे पाणी ओसरल्याने सुमारे १००० विद्यार्थी असलेल्या विक्रमगड येथील कै. बाळाराम भोईर आश्रमशाळेच्या विद्यार्थींना पाणी टंचाई भेडसावत होती. आश्रमशाळेच्या शिक्षकांनी व संस्था चालकांनी साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मशिलकर यांच्याकडे आश्रमशाळेला बोअरवेल करून देण्याची विनंती केल्या नंतर गेल्या ३ दिवसात बोअरवेलचे काम पूर्ण करण्यात आले.
शाळेला पाण्याची गरज जास्त आहे त्यामुळे उदघाटनाची प्रतिक्षा न करता तहानलेल्या मुलांना पाणी पुरवठा करा असा मोलाचा सल्ला आदित्यजी ठाकरे यांनी दिल्याने संजय मशिलकर यांनी कै. बाळाराम भोईर आदिवासी आश्रमशाळेचे अध्यक्ष विजय जाधव, संस्थेचे सचिव जी.आर.पाटील, मुख्याध्यापक पवार सर यांच्या उपस्थितीत या बोअरवेलचे उदघाटन आज केले.
या बोअरवेलला प्रचंड प्रमाणात पाणी लागल्याने भविष्यात वसतिगृहातील पाणी प्रश्न कायमचा सुटला असल्याचा विश्वास संस्था चालकांनी व्यक्त केला आणि मनापासून आदित्यजी ठाकरे व साहेब प्रतिष्ठान अध्यक्ष संजय मशिलकर यांचे आभार मानले. या बोअरवेलच्या कामाकरिता मयुर पाटील, प्रमोद कांबळे, शिवाजी खराडे आदी सहका-यांनी मेहनत घेतली.