निवडणूक साक्षरता क्लब अंतर्गत नवीन प्रशासकीय भवनात रांगोळी व चित्रकला स्पर्धा

0
251

गोंदिया,दि.०८ : येत्या ११ एप्रिल रोजी होणाèया लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत जिल्हयातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणूक साक्षरता क्लब अंतर्गत उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी गोंदिया यांच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयातील मोकळया जागेत ७ एप्रिल रोजी मतदार जागृती अभियान या विषयावर रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत स्पर्धकांनी चांगला प्रतिसाद दिला. ७ ते २५ वर्ष वयोगटातील १७ स्पर्धकांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग घेवून त्यांच्या कल्पनेतून मतदार जागृती विषयी रांगोळ्या रेखाटल्या. तर याच वयोगटातील १६ स्पर्धेकांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. विजेत्यांना प्रथम पुरस्कार ५००/-, द्वितीय पुरस्कार ३००/- आणि तृतीय पुरस्कार २००/- रोख आणि सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. कादबंरी बलकवडे यांनी रांगोळी व चित्रकला स्पर्धेला भेट देवून स्पर्धकांचा उत्साह वाढवून त्यांना कौतूकाची थाप दिली. स्पर्धा यशस्वीतेसाठी उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या मार्गदर्शनात सारीका बन्सोड, विठ्ठल मस्के, पी. झेड. बिसेन, शीला मडावी, मुकूंद तिवारी यांनी परिश्रम घेतले. माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी सहकार्य केले.