भाजपचे माजी आमदार हरिष मोरे राष्ट्रवादीच्या मंचावर

0
19
साकोली,दि.०८- जशी जशी भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील मतदानाची वेळ जवळ येत आहे तस तसे सत्ताधारी भाजपची डोकेदुखी मात्र वाढत चालली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा विधानसभा मतदार संघातील भाजपचे माजी आमदार हरिष मोरे हे आज साकोली येथील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या मंचावर आल्याने या मतदार संघात राजकीय भूकंप आला आहे. परिणामी, भाजपची धडधड वाढली असून हा भाजपला मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.
राष्ट्रवादी – राष्ट्रीय कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खा. प्रफु्ल्ल पटेल. माजी आमदार राजेंद्र जैन सुनील फुंडे. खासदार मधुकर कुकडे सेवक वाघाये, ज्वाला धोटे, गंगाधर परशुरामकर,प्रेमसागर गणविर,आमदार प्रकाश गजभिये, जिप अध्यक्ष नरेश डोंगरे, सदाशिव वलथरे , राजेश नदागवली, अजय तुमसरे यांचेसह अननेक नेत्यांनी साकोलीच्या प्रचाकर सभेत हजेरी लावली होती. यावेळी भाजपचे माजी आमदार हरिष मोरे यांनी आपली उपस्थिती राष्ट्रवादीच्या मंचावर दिसल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तिरोडा विधानसभा मतदार संघ हा सध्या भाजपच्या  ताब्यात असल्याने आणि हरिष मोरे यांची वेगळी ओळख गोंदिया जिल्ह्यात असल्याने त्यांच्या प्रतिमेचा फायदा हा आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी, तिरोडा विधान सभेचे विद्यमान आमदार यांची धाकधुक या निमित्ताने चांगलीच वाढल्याचे बोलले जात आहे.