आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा १४ एप्रिल रोजी

0
21

गोरेगाव,दि.13 : परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना कटंगी (बु.), आदर्श (सामूहिक) विवाह समिती गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा १४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगाव येथे करण्यात आले आहे.

या विवाह सोहळ््याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून खा. प्रफुल्ल पटेल, राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले, आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. रामरतन राऊत, आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, माजी आ. खुशाल बोपचे, दिलीप बन्सोड, जी.आर. राणा, जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, खोमेश रहांगडाले, टोलसिंगभाऊ पवार, हेमंत पटले, माधुरी टेंभरे, किसन मानकर, अजमन रावते, झामसिंग बघेले, लिना बोपचे आदी उपस्थित राहणार आहेत. या आदिवासी विवाह सोहळ््या एकूण २७ जोडप्यांचा विवाह होणार आहे. या विवाह सोहळ््या नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन आदर्श सामूहिक विवाह समितीचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव किरसान, उपाध्यक्ष रामचंद्र फरदे, सचिव अजय कोठेवार, वाय.सी. भोयर, मुलचंद खांडवाये, एच.सी. भोयर, सुनील कोसमे, वीरेंद्रसिंह चाकाटे, सुरज कोयलारे, प्रभुदयाल मसे, राजेश राऊत, रामचंद लटये, डेव्हिड राऊत, शिवानंद फरदे, झामसिंग भोयर, सुभाष चुलपार, टी.एम. बिसेन, भोजराज भोयर, कारू फरदे, भरत घासले, पितांबर मारगाये, राजेंद्र दिहारे, रविंद्र पुंगळे, शंकर काठेवार, आरती चवारे, संजय धानगाये, आनंद चर्जे, रूपेंद्र दिहारे, खुशाल खुटमोडे, गोविंदा भोयर, लिना नाईक, परमानंद चुलपार, मोरेश्वर येल्ले आदींनी केले आहे.