मुख्य बातम्या:
दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाला १४ शील्ड प्रदान# #गुंगीचे औषध देऊन ढोंगी बाबाने नातेवाईकांसमोरच मुलीवर बलात्कार# #अस्वच्छ टाकीतून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा# #अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा निषेधार्थ राजुरा शहर कडकडीत 'बंद'# #जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा हक्क# #नांदेड लोकसभा मतदारसंघात ६५.१५ टक्‍के मतदान# #सिरेगावबांध ग्रामपंचायत व शिवाजी राजेगृपच्यावतीने रक्तदान# #वऱ्हाड घेऊन जाणारे वाहन उलटून तीन जण ठार, १२ जखमी# #...तर पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला व दलितांवरील अन्यायावर गप्प का? - राज ठाकरे# #रिसोड विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.९२ टक्के मतदान

जेष्ठ पत्रकार सुंदर लटपटेंनी केली आत्महत्या

औरंगाबाद,दि.१४ ः-एकलव्य प्रकाशनाच्या माध्यमातून पत्रकारीता जगतात आलेले आणि आपली विशेष ओळख तयार करणारे जेष्ठ पत्रकार सुंदर लटपटे यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याच्या घटनेने आज (दि.14) शहरात खळबळ उडाली.लटपटे यांनी आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांचे मेहूने संजीव उन्हाळे यांनी आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा उल्लेख केला आहे. माझे तीस वर्षाचे संसार मोडण्यास उन्हाळे जवाबदार असल्याचा लटपटेंनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेला आहे.शेवटी माझे पोस्ट मार्टम करू नये, मुखाग्नी देवू नये. धार्मिक विधी करू नये. बहिण गजाबाई गर्जे हिचा निर्णय अंतीम असेल. अंत्य दर्शनाला पत्नी आली तरी बरे वाटेल असते असे लिहिले आहे.पोलिसांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरु केली असून सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेला मजकूर लटपटेंनीच लिहला आहे का ? की इतर कुणी हे चौकशीत समोर येणार आहे. या घटनेने  लटपटे यांना एकलव्य प्रकाशनाच्या माध्यमातून ओळखणारा वर्ग मात्र स्तब्ध झालेला आहे.

Share