हरयाणात बस अपघात, ७ ठार १९ जखमी

0
15

वृत्तसंस्था
अंबोला-हरयाणामध्ये खाजगी बस व ट्रकमध्ये अपघात झाला असून या अपघातात ७ ठार तर १९ जण जखमी झाले आहेत. ही बस खाजगी शाळेची असून मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश अधिक आहे. अशी माहिती आज मंगळवारी पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहा – सहजादपूर रस्त्यावर खाजगी शाळेची बस व ट्रकदरम्यान अपघात झाला. हा अपघात एवढा जबरदस्त होता की यात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १९ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी चंदीगढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.