पंस सदस्य प्रदीप मेश्रामचे सदस्यत्व रद्द

0
14

तिरोडा,दि.30ः-तिरोडा पंचायत समितीअंतर्गत चिखली पंचायत समिती अंतर्गत जून २ 0१५ मध्ये निवडून आलेल्या प्रदीप प्रेमदास मेर्शाम यांना तीन अपत्य असून एक अपत्य दत्तक दिली असून शपथपत्रामध्ये दोन अपत्याची माहिती दिली. यामुळे खडकसिंग जगणे यांनी आयुक्त यांच्याकडे अर्ज केला असता आयुक्त यांनी सदस्यत्व रद्द करण्याबाबत २८ एप्रिल २0१६ ला आदेश पारित केले. पंचायत समिती सदस्य प्रदीप प्रेमदास मेश्राम यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठामध्ये रिट याचिका क्र.३३0२/२0१७ नुसार सादर आदेश खारीज करण्याबाबत अपील केले असता उच्च न्यायालयाने ९ एप्रिल २0१९ रोजीच्या आदेशानुसार पस सदस्य प्रदीप प्रेमदास मेश्रामटा अर्ज फेटाळून आयुक्त नागपूर यांचे आदेश कायम ठेवत तीन अपत्य असल्यामुळे सदस्यत्व रद्द केले. यामुळे पंस सदस्य प्रदीप मेश्राम यांचे पंचायत समिती सदस्यत्व रद्द होवून अपात्र घोषीत झाले आहे.