भिवकुंडीत 1 मे रोजी महाश्रमदान 2000 च्या वर जलमित्र होणार सहभागी

0
17
माेर्शी,दि.30ः- तालुक्यातील  तालुक्याच्या ठिकाणापासून 8 किमी अंतरावर डोंगर पायथ्याशी वसलेले भिवकुंडी हे गाव यंदा पहिल्यांदाच सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले असून 1 मे रोजी तालुक्यात होणाऱ्या पाणी फाउंडेशन महाश्रमदानाचा यजमान पद भुसवत तयारीला लागले आहेत. अनेक सामाजिक संस्थांनी ह्या श्रामदानाचा विडा उचलला आहे. श्रमदानात लागणारे साहित्य, नास्ता, पाणी ची जबाबदारी घेत श्रमदानाच्या तयारीचे आव्हान पेलले आहे. येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन गावकर्यांनी केले आहे. ह्या महाश्रमदानाचे स्वरूप असे महा असेच असावे ह्यासाठी विविध शाळा महाविद्यालयात पाणी फाउंडेशन च्या टीम ने आव्हान केले असून, सामाजिक संस्था, व्यापारी संघ, डॉक्टर युनियन, शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी संघटना ह्यात सामील होणार आहेत. तसेच जलमित्र डॉट ओरजी ह्या संकेतस्थळावरून 500 च्या जवळपास जलमित्रांनी स्वयंस्फुर्ती ने मोर्शी तालुक्यात श्रमदान करायचे निर्णय घेतले असून ते सुद्धा भिवकुंडी येथे उपस्थित राहणार आहेत.
भिवकुंडी हे गाव तसे आदिवासी वस्तीचे त्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांचा स्वागतासाठी आपल्या आदिवासी लोककलेने भुरळ घालण्यासाठी जयत तयारी सुरू झालेली आहे. येणाऱ्या पाहुणे मंडळींना कोणत्याही प्रकारची गैरसुविधा होऊ नये ह्या करिता प्रशासनाने सुद्धा हातभार लावले असल्याचे दिसते. स्पर्धेदरम्यान पाणलोट विकासाच्या कामांना गती यावी ह्यासाठी मा. जिल्हाधिकारी ह्यांनी विशेष लक्ष पुरवून अधिकाऱ्यांना कामात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहे. काही दिवसांपूर्वी सत्यमेव जयते पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेच्या सहभागी गावांना  जिल्हाधिकारी ह्यांनी भेटी देऊन कामाचा आढावा देत अधिकाऱ्यांना रखडलेल्या कामांना तत्काळ मार्गी लावण्याचे सुद्धा सांगितले आहे त्यामुळे आता मोर्शी तालुक्यात जलसंधारणाचे भरपूर काम होतील असे चित्र दिसत आहे.
येणाऱ्या श्रमकर्यांना श्रमदानाची जागा शोधण्यास अडचण होऊ नये म्हणून रस्त्याच्या कडेला मोर्शी ते भिवकुंडी दिशादर्शक लावले आहेत. तसेच श्रमदानाच्या ठिकाणी आखणी करत १० हेक्टर एवढ्या क्षेत्रात नियोजन करून गावकरी तयारीत आहेत. आरोग्य विभागाला माहिती पुरवून रुग्णवाहिकेची सुद्धा सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती पाणी फाउंडेशन मोर्शी तालुक्याचे तालुका समन्वयक श्रीकांत उमक आणि राणी सुर्वे ह्यांनी दिली.