जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम संपन्न

0
24

गोंदिया, दि.३० : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदियाच्या वतीने नुकताच जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांच्या अध्यक्षतेखाली मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे, सह दिवाणी न्यायाधीश एन.आर.वानखेडे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष टी.बी.कटरे, वरिष्ठ अभियोक्ता ओम मेठी, जिल्हा सरकारी वकील एम.एस.चांदवानी, न्या.व्ही.आर.आसुदानी, न्या.श्रीमती जरुदे, न्या.वासंदी मालोदे, न्या.बच्छेले, न्या.व्ही.के.पुरी यांच्यासह गोंदिया वकील संघाचे सर्व वकील तसेच पॅनलचे सर्व वकील यांची प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
मध्यस्थी प्रकरणाबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहास माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एम.बी.दुधे यांनी सन २०१२ ते मार्च २०१९ पर्यंतच्या मध्यस्थीसाठी ठेवलेली प्रकरणे, त्यापैकी आतापर्यंत निकाली काढलेली प्रकरणे व सध्या शिल्लक असलेल्या मध्यस्थी प्रकरणाबाबत उपस्थितांना माहिती दिली. ॲड.मेठी यांनी देखील मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन ॲड.मंगला बंसोड यांनी केले. उपस्थितांचे आभार टी.टी.कटरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक आर.जी.बोरीकर, कनिष्ठ लिपीक एल.पी.पारधी, पी.एन.गजभिये, शैलेश पारधी व अन्य कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.