कालच्या भूसुरुंग स्फोटानंतर नक्षल्यांची बॅनरबाजी

0
12

गडचिरोली,दि.02ः-कुरखेडा तालुक्यातील जांभुरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी काल भूसुरुंगाचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले. कालच्या या भ्याड हल्ल्यानंतर नक्षलवाद्यांनी बॅनरबाजी करत सरकारला धमकी दिली आहे. पूल आणि रस्ते बांधू नका, असे बॅनर उत्तर गडचिरोली परिसरात नक्षलवाद्यांकडून लावण्यात आले आहे. उत्तर गडचिरोली विभागीय कमिटीद्वारे अशाप्रकारचे बॅनर अनेक गावांमध्ये लावण्यात आले आहेत.या परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर्सद्वारे एप्रिल 2018 मध्ये कसनसूर येथे झालेल्या 40 नक्षलींच्या एन्काऊंटरचा निषेध नोंदवण्यात आला आहे. 27 एप्रिल 2019 रोजी डिव्हीसी कॉम्रेड रामको नरोटी हिचा देखील पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. या घटनेचा सुद्धा निषेध करण्यात आला आहे. याचबरोबर, आज राज्याचे पोलीस महासंचालक संजय जायस्वाल, पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देखील घटनास्थळी भेट दिली.