राजकीय नेतेच नक्षल्यांना दारूगोळा पुरवतात, शहीदपुत्र मातेचा गंभीर आरोप

0
14

भंडारा(विशेष प्रतिनिधी)दि.02ः – गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभुरखेडा येथे झालेल्या नक्षली हल्ल्यात भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दिघोरी येथील दयानंद सहारे हे जवान शहीद झाले.विशेष म्हणजे आज शहीद देवानंदचा वाढदिवस असताना वाढदिवसीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत असताना कुटुबिंयच नव्हे तर अख्खे ग्रामस्थांच्या डोळ्यातून अश्रूधारा निघत होत्या.त्यामुळे महाराष्ट्रातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. नक्षलवाद्यांकडे स्फोटके कुठून येतात, अशा प्रतिप्रश्न उपस्थित करीत नेत्यांकडूनच त्यांना स्फोटके पुरविले जातात. असा गंभीर आरोप शहीद दयानंदच्या आईने केला आहे.नेते लोकांच्या या कृत्यामुळेच आमच्या मुलांचे जीव आज गेल्याची संतप्त प्रतिक्रिया माध्यांमाना दिली.

नेते लोकंच नक्षल्यांना भडकावतात, त्यांना दारूगोळासह इतर साहित्य देतात. नक्षलवाद्यांना राजकीय नेतेच आपले राजकीय वजन वाढविण्यासाठी स्फोटके पुरवतात. त्यामुळेच आमच्या मुलांचे जीव जातो, असे दयानंद शहारे यांच्या आईने म्हटले आहे. आपल्या शहीद पुलाच्या पार्थिवाची वाट बघत असता माध्यमांना प्रतिक्रिया देताना वीरमातेच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. लाखांदूर तालुक्यातील दिघोरी येथील दयानंद शहारे हे 2011 मध्ये गडचिरोली पोलीस म्हणून रुजू झाले होते. ते लहान असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या आईने त्यांना मजुरी करून शिकविले आहे. तर दयानंद यांनी स्वतःही मजुरी करत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, साडेतीन वर्षाची एक मुलगी आणि 12 महिन्यांची मुलगी आहे. दुर्दैवी घटना म्हणजे दयानंद शहारे यांचा आज जन्मदिवस आहे. आजच त्यांच्या कुटुंबाला त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. नक्षलांच्या भ्याड हल्ल्यात भंडारा जिल्ह्यातील तीन मित्रांना वीरमरण आले आहे. त्यामुळे जवानांच्या मृत्यूचा बदला घ्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील ग्रामस्थांनी केली आहे.