पोलीस विभागातील जप्त वाहनांची विल्लेवाट केव्हा?

0
29

गोंदिया,दि.05 : विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेली मात्र गेल्या वर्षानुवर्षांपासून पोलीस ठाण्याच्या आवारात पडून भंगार जमा झालेल्या वाहनांचा लिलाव गेल्या कित्येक वर्षात करण्यातच आलेला नाही.त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात अशा भंगार वाहनांचा खच पडलेला आहे. ही भंगार वाहने ठेवण्यात आलेल्या पोलीस ठाण्यातील मोठापरिसर त्यात खर्ची पडला आहे. मात्र या गंभीर बाबीसंदर्भात वरिष्ठ पातळीवरून कुठलीही उपाययोजनाच करण्यात येत नसल्याने पोलीस ठाण्यातील कर्मचाNयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गुन्ह्यांमध्ये ज्या वाहनाचा वापर करण्यात आलेला असेल तो वाहने त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान जप्त करण्यात येतात.
त्यानंतर ती वाहने गुन्हा घडला असलेल्या पोलीस ठाण्याच्या परिसरात आणून ठेवण्यात येतात.त्यासोबतच विविध प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चोरी करण्यात येणाNया सायकल, दुचाकी आणि चारचाकी वाहनांना ही जप्त करण्यात येते. ही सर्व वाहने संबंधीत पोलीस ठाण्याच्या परिसरात ठेवण्यात येतात. या वाहनासंदर्भात न्यायालयाकडून आदेश प्राप्त झाल्याशिवाय कुठलीही उपाययोजना करण्याची मुभा पोलीस प्रशासनाला नसते.त्यामुळे गेली वर्षानुवर्षे अशा प्रकारची वाहने पोलीस ठाण्याच्या परिसरात जमा होत चालली आहेत. अनेक वर्षापासून पोलीस ठाण्याच्या परिसरात
ठेवण्यात आलेल्या वाहनापैकी ८० टक्के वाहने ही भंगार जमा झालेली आहेत.याशिवाय पोलीस ठाण्याच्या आवारात अशा वाहनांना खच पडलेला दिसून येतो. मात्र या वाहनांची विल्हेवाट लावण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाच्यावतीने कुठल्याही हालचाली करण्यात येत असलेलया दिसून येत नाही.त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारातील राच भाग या वाहनांमुळे अनेक वर्षापासून त्यासाठी गुंतून पडलेला आहे. न्यायालयाकडे पाठपुरावा करून गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या आणि चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्याची परवानगी मिळविणे शक्य असते. मात्र नुसत्या
भानगडी कोण करणार याचा विचार करीत या गंभीर बाबींसंदर्भात पुढाकार घेण्यासाठी कुठल्याही पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढकार घेत नाही.त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून हा गंभीर प्रश्न तशाच पध्दतीने खितपत पडलेला आहे. त्यामुळे या वाहनांचा लिलाव करून त्याव्दारे शासनाच्या तिजोरीत दोन पैसे जमा होण्याऐवजी ही भंगार वाहने ठेवण्यासाठी शासनाची लाख मोलाची जमीन खर्ची पडत
आहे. ही बाब लक्षात घेता आता या संदर्भात पोलीस प्रशासनाने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

वाहनांची नेमकी संख्या किती?
पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या मालखान्यात अशा प्रकारच्या भंगार वाहनांचाहिशेब असणे आवश्यक असते. मात्र ्रगेल्या कित्येक वर्षात त्या ठिकाणचे कर्मचारी सातत्याने बदलते असल्याने सध्या
परिस्थितीत पोलीस ठाण्यात भंगारात पडून असलेल्या वाहनांची नेमकी संख्या कीती याचा हिशेबही पोलीस ठाण्यात मिळणे शक्य नाही.अनेकांची घ्यावी लागते परवानगी पोलीस ठाण्यात बेवारस सापडून आलेल्या वाहनांचा लिलाव करणे शक्यत आहे. मात्र त्यासाठी सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते. त्यानंतर आरटीओ विभागाकडून त्याची तपासणी आणि
खात्री करावी लागते.त्यानंतर त्या विभागांकडून याची पाहणी करून पोलीस दलाला अशा बेवारस वाहनांचया लिलावाची परवागी देण्यात येते. मात्र ही प्रक्रिया लांबलचक आणि तितकीच किचकट असल्याने कुणी त्यांच्या भानगडीतच पडत नाहा