श्री दत्तशिखर घाटात अपघात ब्रेक निकामी झाल्याने बोलेरो पीकउप मालगाडी झाली पलटी 22 जखमी

0
16

पीकउप मालगाडी झाली पलटी 22 जखमी

5 भाविक गंभीर

श्री क्षेत्र माहूर। माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीद दर्गाह वझरा येथे कंदोरी करण्यासाठी मौजे इचोरा ता आर्णी जी यवतमाळ येथील भाविकांना घेऊन जात असलेला महिंद्रा मिनी टेम्पो श्री दत्त शिखर घाट उतरत असताना ब्रेक फेल झाल्याने वळणावर पलटी झाल्याने झालेल्या अपघातात 05 भाविक गंभीर तर 17 भाविक जखमी झाल्याची घटना दि 9/5/2019 रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी घडली आहे श्री क्षेत्र माहूर। माहूर तालुक्यातील मौजे शेख फरीदबाबा दर्गाह वझरा येथे कंदोरी कार्यक्रम करण्यासाठी मौजे इचोरा ता आर्णी जी.यवतमाळ येथिल 22 महिला व पुरुष भाविक श्री दत्त शिखर घाटातून वझरा येथे महिंद्रा पीक उप वाहन क्र MH29BE-0379 ने जात असतांना गाडीचे ब्रेक फेल झाल्याने गाडी पलटी होवून मागील बाजूस ( डाल्यात ) बसलेले ओम विष्णू जाधव 11 वर्ष वर्ष ,यमुनाबाई जाधव वय 60 वर्ष, विष्णू जाधव वय38,बाळू जाधव वय 44,मोहन जाधव वय 60 ,तुळशीराम राठोड वय 45,संगीता आडे वय 42,अविनाश पवार वय 42,कांताबाई पवर वय 52,रूपेश जाधव वय 10,मधुकर जाधव वय 50,हिराबाई राठोड वय 60,विद्या पंकज आडे वय 32,सुदाम राठोड वय 50,प्रवीण आडे वय 8,निखिल राठोड वय 19,बाबाराव राठोड वय 60,देवीदास जाधव वय 30,पवनकुमार आडे वय 22,कैलास जाधव वय 40, गोपाल राठोड वय 15 , सुभाष आडे वय 42,सर्व रा, इचोरा ता आर्णी जी यवतमाळ जखमी झाले आहेत यापैकी 5 भाविकांना डोके हात पाय पाठीत गंभीर मर लागला. अपघात झाल्याचे दिसताच रस्त्याने जाणाऱ्या खासगी वाहन धारकानी व श्री रेणुका देवी च्या रुग्णवाहिका द्वारे सर्व रुग्णांना माहुरच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले येथे डॉ व्ही एन भोसले, डॉ पी बी भबुतकर,डॉ निरंजन केशवे,डॉ ए डी आंबेकर ,डॉ एस बी चौधरी, डॉ एस ओ मुनगीलवार, यांनी तातडीने उपचार करून गंभीर जखमीना तात्काळ यवतमाळ येथे पाठविले घटनेची माहिती मिळताच उप वी पो अ आसाराम जहारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि लक्षमन राख पो उप नि शरद घोडके पो का विष्णू मुटकुळे, पोका दीपक लिंगायत,पो का सुशील राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करत घटनेची नोंद घेतली———————————-कंदोरी साठी जात असलेल्या गाडीत वाहनचालकासह पाच भाविक गंभीर जखमी तर इतर सर्व जणांना किरकोळ मार लागला कंदोरी साठी एक बोकुडही सोबतच घेण्यात आला होता बोकुड गाडी खाली दबल्या गेला त्यास गाडी हलवून बाहेर काढून पाहणी केली असता त्याचा एक शिंग तुटला तर अनेक ठिकाणी किरकोळ जखमा झाल्या हातातून सुटताच त्याने धूम ठोकली मदत करणाऱ्यांनी त्यास पकडून पुन्हा भावीकांच्या हवाली केले ——————————–माहूर शहर हे तीर्थक्षेत्र चे ठिकाण आहे येथे वर्षभरात लाखो भाविक पर्यटक येतात शहरासह गाढावर जाण्यासाठी चारही बाजुनी घातक वळणदार रस्ते असल्याने येथे अनेक जीवघेणे अपघात होऊन अनेक भाविकांना उपचाराआभावी जीव गमवावा लागला आहे शिवाय आता माहूर शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच तालुक्यातील रुग्णांना फ्रँकच्चर झाल्यास सरळ यवतमाळ गाठावे लागते त्यामुळे गेल्या 7 वर्षांपासून शहरात जागा उपलब्ध असल्याने ट्रा मा केअर सेंटर उभारण्यात यावे अशी मागणी होत असताना पालकमंत्री खासदार आमदार व पदाधिकाऱ्यांनी या मागणीकडे कायम दुर्लक्ष केल्याने अनेकांना जीव गमवावा लागत असून सध्या उपचारासाठी रेफर व्हावे लागत असल्याने येथे ट्रामा केअर सेंटर उभारावे अशी मागणी होत आहे